Home राजकीय राष्ट्रवादीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना देशाचा नकाशाच बदलला!

राष्ट्रवादीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना देशाचा नकाशाच बदलला!

0

काल अर्थात २६ जानेवारी रोजी देशभरात ७१वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान अनेकांनी सोशल मीडियावरून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मात्र  राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुभेच्छा देतांना मोठी चूक झाली आहे. आपल्या अधिकृत फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवरून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी चूक झाली असून, शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रामध्ये चक्क देशाचा चुकीचा नकाशा वापरण्यात आला आहे.

वरील पोस्ट पाहून तुमच्या लक्षात येईलच की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जो देशाच्या नकाशा वापरला आहे तो चुकीचा आहे. या नकाशामध्ये जम्मू काश्मीर आणि लदाखची सीमारेषा चुकली असून, पाकव्याप्त काश्मीर तसेच अस्थायीचीन हे भाग नकाशात दाखवण्यात आलेले नाहीत. ट्विटर वरही हाच प्रकार पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून केलेली पोस्ट पिढीला प्रमाणे:

या शुभेच्छांवर नेटकरी संताप व्यक्त करीत असूनही आता या पोस्ट मागे घेण्यात आलेल्या आहेत.