Home आरोग्य गाडीवर sanitizer फवारणी करताय? सावधान गाडीचा स्फोट होतोय! पहा व्हिडिओ

गाडीवर sanitizer फवारणी करताय? सावधान गाडीचा स्फोट होतोय! पहा व्हिडिओ

0

सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये अहमदाबाद गुजरात मधील एका चौकात sanitizer फवारणी सुरू आहे, जेणेकरून गाड्यांवरील कोरोनाचे विषाणू नष्ट होतील.

ज्या क्षणी sanitizer ची फवारणी या दुचाकीच्या मागच्या भागावर केली गेली एक आगीचा मोठा गोळा ज्वलंत झाला आणि दुचाकीने पेट घेतला. घाबरलेल्या दुचाकीस्वाराने गाडी तिथेच टाकत जीव वाचवला.

या घटनेने मात्र सर्वत्र सुरू असलेली sanitization ची पद्धत कशी जीवावर बेतू शकते हे कळते. कोरोना रुग्णाच्या एकदा खोकल्यावर उडालेल्या शिंतोड्यातून जवळजवळ ३००० विषाणू बाहेर पडतात आणि धक्कादायक म्हणजे हे विषाणू एखाद्या धातू पृष्ठभागावर 2 ते 3 दिवस जिवंत राहतात. याच कारणामुळे गुजरात सरकारने तेथील अधिकाऱ्यांना गाड्यावर sanitizer फवारणी करण्यास सांगितले होते.

दरम्यान आता कोरोनविरुद्ध लढाई मध्ये वापरलेल्या अनेक गोष्टींचा काळजीपूर्वक वापर करणे किती महत्वाचे ठरते हे लक्षात येते. दुचाकी पेट घेण्याचा हा प्रकार उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे झाला आहे असे मत आहे पण आपण जर दुचाकी वर अशी फवारणी करत असाल तर योग्य ती काळजी घेऊन करावे हे नक्की!