Home राष्ट्रीय नेपाळमार्गे भारतात कोरोनाचा स्फोट घडवण्याचा डाव उधळला, जैविक दहशतवादी कारवायांना सुरुवात!

नेपाळमार्गे भारतात कोरोनाचा स्फोट घडवण्याचा डाव उधळला, जैविक दहशतवादी कारवायांना सुरुवात!

0

जगभराध्ये कोरोना व्हायरसने कहर केला आहे. यामुळे भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या शक्तींनी आता भारतात जीवघेणा जैविक हल्ला करण्यासाठी कोरोनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तसा प्रयत्नही करण्यात आला आहे. तसेच ४० कोरोना झालेल्या लोकांना भारतात कोरोना पसरविण्यासाठी पाठविण्याच्या तयारीत असलेल्या जालिम मुखियाला नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे.

या जालिम मुखियाने ४० तबलिगी जमातीच्या लोकांना आसरा देऊन ठेवला आहे. रक्सौल सीमेवर भारतीय जवानांनी पाकिस्तान, इंडोनेशिया आणि भारतातील काही जमातींना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते नेपाळच्या सीमेमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते.जालिम मुखियावर आरोप आहे की, त्याने या लोकांना आसरा दिला होता. यानंतर नेपाळ पोलिसांनी जगन्नाथपूरचा महापौर असलेल्या या मुखियाला अटक केली आहे. मुखिया हा शस्त्रांची तस्करी करत असतो. नेपाळ सीमेवरून त्याचा हा गोरखधंदा चालतो. तो जग्रनाथपूर गावातील रहिवासी आहे. माओवाद्यांच्या एका गटातही तो सहभागी असल्याचे सांगितले जाते. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचा सदस्यही आहे. गेल्या वेळच्या नेपाळ निवडणुकीत त्याची महत्वाची भूमिका होती. त्याचे गाव हे दोन देशांच्या सीमेवर आहे.

एसएसबीने बेतियाच्या पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहून नेपाळ सीमेवरून भारतात ४० ते ५० कोरोनाग्रस्त लोक घुसखोरी करणार आहेत. या लोकांना भारतामध्ये कोरोना व्हायरस पसरविण्यासाठी पाठविण्यात येत आहे. खासकरून बिहारमध्ये हे जैविक मानवी बॉम्ब फोडायचे आहेत. त्यांना जालिम मुखिया मदत करणार आहे, अशी सूचना केली होती