एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्ड वर ज्याचा प्रचंड दबदबा होता असा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम च्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या सोशल मीडिया वर सध्या चांगल्याच जोरात आहेत. CNX नावाच्या एका वृत्त वहिनीने दिलेल्या वृत्तामुळे सोशल मीडिया वर हा प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला आहे. तथा कुठलीही खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही.
शुक्रवारी उशिरा गुप्तचर यंत्रणा मार्फत दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीस कोरोना झाल्याचे जाहीर केले होते, दाऊद आणि त्याची पत्नी या दोघांना पाकिस्तान मधील लष्कराच्या दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान दाऊद इब्राहिम चा भाऊ अनिस याने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला असून, दाऊद आणि त्याची पत्नी दोघेही अगदी नीट आणि ठणठणीत असल्याचे त्याने सांगितले.
वृत्तसंस्था आयएएनएसनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम यांनी अज्ञातस्थळावरून फोनवरून सांगितले की, दाऊदच्या कुटुंबातील सर्व सदस्य ठीक आहेत. त्याच्या कुटुंबातील कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. अनीस युएईच्या लक्झरी हॉटेल आणि पाकिस्तानमधील मोठ्या बांधकाम प्रकल्प व्यतिरिक्त वाहतुकीचा व्यवसाय देखील चालवित आहे.
सोशल मीडियावर मात्र तुफान मिम्स आणि जोक्स पाठवले जात आहेत. भारताचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन ने सुद्धा ट्रोल केले आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार जगातील विख्यात गुप्तचर संस्थांना जे जमले नाही ते कोरोनाने करून दाखवले आहे!