Home राष्ट्रीय रेल्वेच्या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात, देशात उद्यापासून रेल्वेगाड्या रोज धावणार

रेल्वेच्या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात, देशात उद्यापासून रेल्वेगाड्या रोज धावणार

0

रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमचं प्रवासी वाहतूक तब्बल महिनाभर बंद होती, मात्र रेल्वे मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे रविवारी जाहीर केले की देशात १२ मे पासून प्रवासी रेल्वे वाहतुकीला सुरवात होत आहे, सुरवातीला दोन्ही बाजूच्या १५ प्रवासी रेल्वेगाड्या मंगळवार पासून सुरू होतील.

सदर रेल्वेगाड्यांच्या तिकिटांची विक्री ही फक्त ऑनलाइन च्या माध्यमातून होणार असून, IRCTC च्या वेबसाईट अथवा त्यांच्या मोबाईल अँप वर त्याचे बुकिंग करता येईल. उद्या म्हणजेच १२ मे रोजी दुपारी ४ वाजेपासून तिकिटांची सुरवात होईल.

मंगळवारी सुरू होणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या ह्या दिल्ली इथून सुटणाऱ्या असतील तर दिल्ली इथून दिब्रूगड, अगरताला, हावरा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुबनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलोर, चेन्नई, तिरुणांतपुरम, मढगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मूतावी या स्थानकापर्यंत धावणार आहेत.

दरम्यान परराज्यातील मजुरांसाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेन सुद्धा सुरू राहणार असून, श्रमिक स्पेशल च्या ३०० रेल्वेगाड्या रोज धावतील. रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे की ते हळूहळू रेल्वेसेवा सुरू करत पूर्वपदावर आणण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहे.

PIB ने ट्विट करत सदर वृत्त प्रकाशित केले: