सैन्यात भरती होणे ही मोठी सन्मानाची गोष्ट असते. बरेच तरुण सैन्यात जाण्यासाठी इच्छूक असतात. दरवर्षी कित्येक उमेदवार सैन्यभरतीचा अर्ज करतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नोकरी मिळणे अवघड झाले असतांना बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्य दलात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी सैन्यात टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत बारावी पास विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
अर्ज करण्यासाठीच्या अटी :
बारावीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, mathematics हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. या तीन विषयांचे सरासरी ७०% गुण असणे आवश्यक आहे. तसेच २ जुलै २००१ ते १ जुलै २००४ या कालावधीत जन्माला आलेले ‘पुरुष’ उमेदवार अर्जास पात्र आहेत.
अर्ज करण्याची तारीख व प्रक्रिया :
पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे. www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण २०२१ पासून सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण एकूण ५ वर्षांचे असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती होते.