ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर वादग्रस्त ट्विट केली आहे. ‘भारताला हिंदुस्तान नाव दिले असले तरी तुम्ही भारतातील माझा इतिहास मिटवू शकत नाही’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. या ट्विटमुळे आरएसएसच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरएसएसची नेहमी कणखर भूमिका असते. गेल्या काही दिवसांपूर्वी मोहन भागवत एका भाषणात म्हणाले होते की, “भारतात जे राहतात ते सर्व हिंदू आहेत व हिंदू ही एक जीवनशैली आहे.” याच मुद्द्याच्या आधारावर असदुद्दीन यांनी ‘भारत कधीच हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि नसेलही’ असे विधान ट्विटमध्ये मांडले आहे. त्यामुळे देशभरात यावर चर्चा उफाळली असून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.