Home राजकीय राम मंदिराच्या भूमीपूजनाविषयी ओवेसींनी दिले प्रियंका गांधींना प्रतिउत्तर…

राम मंदिराच्या भूमीपूजनाविषयी ओवेसींनी दिले प्रियंका गांधींना प्रतिउत्तर…

0

अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या पंतप्रधान मोदींकडून होणाऱ्या भूमीपूजनाला २४ तासांपेक्षा कमी वेळ राहिलेला असताना इकडे राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच एमआयएम चे नेते आणि खासदार असउद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशीद प्रकरणावरून काँग्रेस च्या महासचिव प्रियंका गांधी यांना टोला दिला आहे .

प्रियांका गांधी यांनी प्रभू श्रीराम मंदिराच्या होणाऱ्या भूमीपूजनेविषयी आनंद व्यक्त करत ट्विट केले होते. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून ओवेसी म्हटले की, “लाजू नका, आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये तुमच्या पक्षाने जी भूमिका बजावली त्याचा अभिमान बाळगा असा” असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे.

प्रियांका गांधींच्या ट्विटमध्ये त्यांनी प्रभू श्रीराम तसेच सीता मातेचे मंदिर उभारण्याबाबत आनंद व्यक्त केला होता. तसेच हा कार्यक्रम धर्माचा, एकात्मता चा तसेच बंधुभावाचा आहे असा उल्लेख त्यांनी केला आहे आणि त्यासाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.