Home राजकीय चिदंबरम आता ईडीच्या ताब्यात; २४ ऑक्टोबरपर्यंत ईडी करणार चौकशी

चिदंबरम आता ईडीच्या ताब्यात; २४ ऑक्टोबरपर्यंत ईडी करणार चौकशी

0

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी जवळपास गेल्या दीड महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत हे आपल्याला ठाऊक असवळच. त्यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत असलेल्या दिसून येत आहेत. याचे कारण म्हणजे नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार त्यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे असे समजले.

गेल्या २१ ऑगस्टला आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने पी चिदंबरम यांना ताब्यात घेतले होते. त्याआधी दिल्लीला जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण निर्दोष असल्याचे सांगितले. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही व त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी दाखल करण्यात आले. जामीन मंजूर होण्यासाठी त्यांच्या बाजूने प्रतिष्ठित वकील नेमण्यात आले. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला व त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यावेळी त्यांना तिहार जेलमध्ये हलवण्यात आले होते. त्यानंतर ईडीने या प्रकरणात चौकशीची मागणी केल्याने त्यांची न्यायालयीन कोठडी अजून वाढवण्यात आली होती.

नुकतीच त्यांची सुटका होण्याची चिन्हे दिसत असतांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी काल ताब्यात घेतले आहे. तसेच ही चौकशी २४ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून त्यांच्या घरचे जेवण, स्वतंत्र जेल, औषधी या सुविधांच्या मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत. असे असले तरी वातानुकूलित (AC) जागेची त्यांची मागणी ईडीने अमान्य केली आहे. तरी चिदंबरम यांच्या सुटकेची तारीख अजून पक्की झाली नसून न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी सांगितल्याप्रमाणे ईडीच्या सुनावणीनंतर सीबीआय प्रकरणाची सुनावणी होईल व नंतर त्यांच्या सुटकेची तारीख ठरवली जाईल.