Home राजकीय पाकिस्तानी लष्कर सांगेल तसंच इम्रान खान वागतो-माजी पत्नी.

पाकिस्तानी लष्कर सांगेल तसंच इम्रान खान वागतो-माजी पत्नी.

0

प्राईम नेटवर्क : पाकिस्तान कंगाल होण्याच्या उंबरट्यावर असताना मंगळवारी पाकचे पंतप्रधान यांनी उर्मट प्रतिक्रिया पाहायला मिळाली पण इम्रान खान हा किती खोटारडा आहे हे त्याच्या माजी पत्नीनेच जाहीर केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी इम्रान खान हे तिथल्या लष्कराच्या परवानगीची वाट पहात होते असं रेहम खान हिने म्हटलं आहे. आपल्या तत्वांना तिलांजली देत इम्रान खान सत्तेवर बसल्याचंही तिने म्हटलं आहे.

मंगळवारी एका हास्यास्पद निवेदनामध्ये इम्रान खान याने पुलवामा हल्ल्याचे हिंदुस्थानकडे पुरावे मागितले होते. याबाबत बोलताना रेहम खान हिने इम्रान खानच्या खोटारडेपणाचा बुरखा अक्षरशा फाडलाय. रेहम खान म्हणाली की इम्रान खान याला पाकिस्तानी लष्कराने शिकवलंय तेच तो करत आहे.

पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कंगाल घोषित केला आहे तरीपण तो भारतासोबत बरोबरी करत आहे, त्यातच दुसऱ्यांवर कारवाई करण्याची भाषा वापरणाऱ्या इम्रान खान याला शब्दांचा मारा करताना रेहम खान म्हणाली की, गेले सहा-सात महिने इम्रान खानने देशाच्या हितासाठी काहीही केलेलं नाहीये. इम्रान खान म्हणत असेल की जैश-ए-मोहम्मदशी पाकिस्तानी सरकारचे काहीही संबंध नाहीयेत मग आत्तापर्यंत या दहशतवादी संघटनांविरूद्ध कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्नही रेहम खान हिने विचारला आहे.