Home राष्ट्रीय पाकिस्तानी दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करावी-पाकिस्तानी मिडियाची मागणी.

पाकिस्तानी दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करावी-पाकिस्तानी मिडियाची मागणी.

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा दहशतवादी हल्यानंतर ”आम्हाला पुरावे द्या.आम्ही योग्य ती कारवाई करु” तसेच “भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर उत्तर देणार” असे बोंबट्या मारणारा पाकिस्तान आता ”आम्हाला शांतत हवी आहे”, असा आव आणत आहे. परंतु, पाकिस्तानी मिडियानेच दहशतवादी संघटनांना पाकिस्तान कसे खतपाणी घालत आहे याचे पितळ उघडे पाडले आहे.

याबद्दल सविस्तर माहिती देताना स्वत: इमरान खान यांच्यासकट पाकिस्तानमधील महत्त्वाच्या व्यक्तिंचे व्हिडिओ पाकिस्तानी मिडियावर दाखविण्यात येत आहेत. आपण अशा प्रकारे आणखी किती दिवस दहशतवादाला पोसणार आणि सत्य अमान्य करणार असा सवालही पाकिस्तान मिडियानेच त्यांच्या राज्यकर्त्यांना विचारला आहे. पाकिस्तानच जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनेला पोसत आहे त्यामुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पाकिस्तानी मिडियाच करत आहे.