Home राष्ट्रीय कोरोना महामारीमुळे एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात आता ‘महामारी व्यवस्थापण’ या विषयाचा समावेश

कोरोना महामारीमुळे एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात आता ‘महामारी व्यवस्थापण’ या विषयाचा समावेश

0

जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतलेल्या कोरोना महामारीचा परिणाम लक्षात घेता अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास पूर्वतयारी म्हणून ‘मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया’ ने एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात ‘महामारी व्यवस्थापन’ अर्थात pandemic management या विषयाचा समावेश केला आहे. मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर विनोद कुमार पॉल यांनी काल २३ ऑगस्टला याबद्दलची माहिती दिली.

जवळपास मागील ५ महिन्यांपासून पसरलेल्या या महामारीमुळे भारतात तसेच इतरही देशांत लॉकडाऊन करावे लागले, ज्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर व जनजीवणावर मोठा परिणाम झाला. इतके दिवस होऊनही कोरोनावर प्रभावी अशी लस मिळू शकलेली नाही. सगळीकडे लशीसाठी संशोधन सुरूच आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत प्रशासनाची तसेच डॉक्टरांचीही बरीच धावपळ झाली. या सर्व बाबी लक्षात घेऊन मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने वैद्यकीय अभ्यासक्रमात महामारी व्यवस्थापन हा विषय समाविष्ट करण्याचे सुचवले. त्यासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे डॉ. अविनाश सुपे यांच्या अध्यक्षतेखाली इतर ९ तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली. या समितीने मागील दीड महिना अभ्यास करून या विषयाचा अभ्यासक्रम बनवला व हा विषय आता वैद्यकीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.