भारतातील नामांकित कंपनी पेटीएमचे मनी ट्रानसेक्शन ऍप पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम हे दोन्ही ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे हे ऍप्स अचनकरित्या प्ले स्टोअरवरून गायब झाले. मात्र पेटीएमचे पेटीएम मॉल, पेटीएम मनी हे ऍप्स अद्याप प्ले स्टोअरवर आहेत.
मीडिया न्यूजनुसार हे ऍप्स जुगारासंबंधातील काही नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे प्ले स्टोअरवरून ते हटवले आहेत असे सांगितले जात आहे. गुगलच्या सुझान फ्रे यांनी सांगितले की ऑनलाईन कसिनो चालवणाऱ्या किंवा सट्टेबाजी करणाऱ्या ऍप्सला गुगल प्ले स्टोअर परवानगी देत नाही.