Home राष्ट्रीय क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने सीमेवर सज्ज देशभरातून सैनिकांच्या तुकड्या सुद्धा रवाना, मोदीजी मनोबल...

क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने सीमेवर सज्ज देशभरातून सैनिकांच्या तुकड्या सुद्धा रवाना, मोदीजी मनोबल वाढवण्यासाठी सीमेवर

0

भारत चीनच्या सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे विरोधीपक्षांनी सरकारकडून लडाखमधील संघर्षासंदर्भात माहिती लपवली जात असल्याचा आरोप केला तर सरकारने हे आरोप फेटाळून लावत भारताची एक इंच जमीनसुद्धा कोणाला देण्यात आलेली नाही असे वक्तव्य ऐकायला मिळत आहे. मात्र आज सरकारने जाहीर केले की सिमाभागावर देशभरातील विविध छावण्यांमधील सैनिकी तुकड्या रवाना केल्या असून, क्षेपणास्त्र आणि रणगाडे तैनात झाले आहेत. इतकंच नव्हे तर चीनला रोखण्यासाठी खास रशिया वरून लढाऊ विमाने तात्काळ बोलावण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाख सिमभागाला भेट दिली असून प्रत्यक्ष पाहणी केली. दोन देशांमधील तणाव वाढत असताना पंतप्रधान यांनी दिलेली भेट हा खूप महत्त्वाचा संकेत समजला जातो. चीन सोबत चर्चा करून वाद सोडवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले असून आता शेवटचा पर्याय म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची प्रत्यक्ष चर्चा, ह्या चर्चेला सफलता मिळाली नाही तर मात्र काय होऊ शकेल हे सांगणे एकंदर अवघड आहे.

देशात अनेक ठिकाणी चीनचा निषेध करत चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी आंदोलनेही झाली. सरकारी स्तरावरही चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी हलचाली सुरु झाल्या आहेत. केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याबरोबरच रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्रामध्ये चिनी कंपन्यांच्या कंत्रांटवर बंदी घालणे, स्थगिती देणे असे निर्णय मागील काही दिवसांमध्ये घेतले आहेत.

निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची मोदींनी भेट घेतली आहे. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून नक्की या परिसामध्ये कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिली.