Home राष्ट्रीय माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोमात; प्रकृतीत काहीच सुधारणा नाही

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोमात; प्रकृतीत काहीच सुधारणा नाही

0

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. तसेच आता ते कोमात गेले असल्याचेही मीडिया न्यूजवरून समजते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आर्मी रुग्णालयाने ट्विटद्वारे ही माहिती दिली.

गेल्या ९ ऑगस्टला प्रणब मुखर्जीं यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पोसिटीव्ह आला होता. तसेच १० ऑगस्टला त्यांची ब्रेन ट्युमरची सर्जरी झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती जास्तच खालावली आहे. तर आता ते कोमात गेले असल्याचे आर्मी रुग्णालयाने सांगितले आहे.