पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीची सुद्धा माहिती दिली आहे. भारतात वैज्ञानिक सद्या ऋषीमुनीप्रमाणे तपस्या करत आहेत. वॅक्सीनचे काम मोठ्या पातळीवर सुरु आहे.
तसेच भारत आरोग्य, शिक्षण, संरक्षण, रोजगार अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे असे मोदिंनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणामध्ये सांगितले.भारतामध्ये तीन लस वेगवेगळ्या टप्प्यावर आल्या आहेत. वैज्ञानिकांची अनुमती आल्यावर हे लस देशभरात पोहोचवले जाईल. हे लस शेवटच्या टप्प्यापर्यंत कसे पोहोचेल याची सर्व व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच भारत प्रत्येक गोष्टीमध्ये आता आत्मनिर्भर बनत आहे. आत्मनिर्भर म्हणजे आत्मविश्वास आहे. भारत अंतराळ क्षेत्रात ही आत्मनिर्भर बनत आहे. आत्मनिर्भर कृषी आत्मनिर्भर शेतकरी यांचा उल्लेख त्यांनी केला. शेतकऱ्यांचं उत्पन्न कस वाढवण्यात येईल यावर भर देण्यात येणार आहे. शेतकरी त्यांचा शेतमाल कुठेही विकू शकतात ते आता बंधनातून मुक्त आहेत असे ते म्हणाले. श्रमाला प्रतिष्ठा द्या. श्रमिकांनी स्वत:चा कौशल्य वाढवा असे आवाहनही त्यांनी केले.
भाषणातील महत्वाचे मुद्दे
देशाच्या प्रगतीचं गौरवगान करुया
व्होकल फॉर लोकल हा नवा संकल्प
व्यापाराला चालना देणार
जनधन योजनेचा गरिबांना फायदा
जलजीवन मिशनला एक वर्ष पूर्ण
पिण्याचं पाणी हा सर्वांचा हक्क
परकीय गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडले
देशातल्या सुधारणांवर भर द्या
जलजीवन योजना राज्याराज्यात लागू
अखेरच्या स्तरापर्यंत पाणी योजना
विकासयात्रेत मागे राहीलेल्या ११० जिल्ह्यांना सर्वांच्या बरोबरीने पुढे आणणार.
मल्टीनोडेल कनेक्टीव्हीटी इन्फ्रा
संकटाला तोंड देण्यास भारत केले सज्ज.