Home राष्ट्रीय जखमी जवानाचे वडील म्हणतात राहुल गांधी गप्प बसा, राजकारण करू नका

जखमी जवानाचे वडील म्हणतात राहुल गांधी गप्प बसा, राजकारण करू नका

0

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चीनशी झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले आणि जवळ जवळ १३ जवान चीनकडे ओलीस होते. त्यानंतर चीनविरोधात भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारताची एकही इंच जमीन कोणाच्याही ताब्यात नाही तसेच कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. पण आज सकाळी आलेल्या वृत्तानुसार चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसलेच नव्हते असे ते म्हणाले. यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे त्यांच्या मते मोदींनी भारताचा भूभाग चीन ला एक दिवसात गिफ्ट म्हणून दिला आहे, जर चिनी सैनिक हे भारताच्या हद्दीत आले नव्हते तर भारतीय सैनिक का आणि कुठल्या ठिकाणी शहीद झाले आहेत?

शहीद झालेल्या 20 जवानांच्या मृत्यूवरून देशातील राजकारण तापलं आहे. याच दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. ‘भारतीय लष्कर सक्षम आहे. ते चीनचा पराभव करू शकतात. राहुल गांधी यांनी यामध्ये राजकारण करू नये. माझा मुलगा लष्करात लढला आणि यापुढेही लढत राहिल’ असं जखमी जवानाच्या वडिलांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. अनेक उद्योजकांनी देखील ई-कॉमर्स कंपन्यांनी चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्याची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. भारतीयांनी जर ठरवलं तर चीनला 17 अब्ज डॉलरचा झटका बसू शकतो. चीनमधून भारतात होणाऱ्या एकूण आयातीमधील रिटेल ट्रेडर्स जवळपास 17 अब्ज डॉलर इतके आहे. यामध्ये खेळणी, घरातील वस्तू, मोबाईल, इलेक्ट्रिक सामान आणि कॉस्मॅटिक उत्पादनांचा समावेश आहे. चीनमधून येणाऱ्या या वस्तू बंद झाल्या तर संबंधित वस्तूंची भारतात निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे असे जरी असले तरी मागच्या वर्षी चिनसोबत झालेल्या संपूर्ण व्यवहारात भारताने ८५% आयात केली असून फक्त १५% निर्यात केली आहे आणि ही ८५% आयात भारतातील उत्पादन कंपन्यांच्या कच्च्या मालाची असल्यामुळे सदर व्यवहार बंद झाल्यास अनेक परिणाम सुद्धा होऊ शकतात.