Home राजकीय स्मृती इराणींचा तो फोटो ट्विटरवर पोस्ट करून राहुल गांधींनी भाजपवर साधला निशाणा!

स्मृती इराणींचा तो फोटो ट्विटरवर पोस्ट करून राहुल गांधींनी भाजपवर साधला निशाणा!

0

काल अर्थात १२ फेब्रुवारीपासून देशभरात विना अनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल १४९ रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यामुळे सामान्यांना महागाईची मोठी झळ सोसावी लागणार आहे. वाढीव रकमेमुळे मुंबईतील घरगुती गॅस सिलेंडरचा दर ८२९.५० रुपये तर दिल्लीतील गॅस सिलेंडरचा दर ८५८.५० रुपये इतका झाला आहे. मीडिया न्यूजनुसार हा वाढीव दर पूर्ववत करण्याची काँग्रेसकडून मागणी करण्यात येत आहेत. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने या मुद्द्यावरून काँग्रेस भाजपवर निशाणा साधत आहे.

लोकमतच्या रिपोर्टनुसार राहुल गांधींनी स्मृती इराणी यांचा एक जुना फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोत स्मृती इराणी भाजपच्या कार्यकर्त्यांसह गॅस सिलिंडर घेऊन आंदोलनाला बसले आहेत. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १५० रुपयांनी वाढ केल्यामुळे आंदोलन करणाऱ्या या भाजपच्या सदस्यांशी मी सहमत आहे.” 

मीडिया न्यूजनुसार हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा केंद्रात युपीएचे सरकार होते. या सरकारचे नेतृत्व काँग्रेसकडे होते. त्याकाळात जेव्हा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती तेव्हा स्मृती इराणी भाजपच्या कार्यकर्त्यांसह आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. या घटनेची आठवण करून देत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधींच्या ट्विटला रिप्लाय करत हंसराज मीना यांनी स्मृती इराणींची २०११ सालची एक जुनी ट्विट शेअर केली. त्यात गॅसचे दर ५० रुपयांनी वाढल्यामुळे स्मृती इराणी यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती.