Home तंत्रज्ञान एन्क्रिप्टेड कनेक्शनसह आठ भारतीय भाषांमध्ये रिलायन्स जिओचे वेब ब्राऊजर लॉंच!

एन्क्रिप्टेड कनेक्शनसह आठ भारतीय भाषांमध्ये रिलायन्स जिओचे वेब ब्राऊजर लॉंच!

0

डिजिटल मार्केटमध्ये दिवसेंदिवस आपली छाप उमटवत असणाऱ्या रिलायन्स जीओचे डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी आता ‘Jio Pages’ नावाचे स्वतःचे वेब ब्राऊजर लॉन्च केले आहे. हे ब्राऊजर इतर वेब ब्राऊजर्सच्या तुलनेत अतिशय वेगवान आणि सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. हे ब्राऊजर स्वदेशी असल्याने त्याचे वापरकर्ते लवकरच मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. तसेच हे ब्राऊजर हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती, तेलगू, मल्ल्याळम, कन्नड आणि बंगाली अशा आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध केले आहे.

आज तक च्या मीडिया न्यूजनुसार हे ब्राऊजर क्रोमियम ब्लिंग इंजिनवर डेव्हलप करण्यात आले असून या ब्राऊजरमध्ये एन्क्रिप्टेड कनेक्शनची खात्री देण्यात आली आहे. याशिवाय पर्सनलाइज्ड कन्टेन्ट, पर्सनलाइज्ड होम स्क्रीन इन्कॉग्नीटो मोड, ऍड ब्लॉकर यांसारखी अनेक वैशिष्ट्ये या ऍपमध्ये पाहायला मिळतील. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गुगलच्या क्रोम ब्राऊजरपेक्षाही जिओचे हे ब्राऊजर फास्ट आणि सिक्युअर असल्याचा दावा कंपनीद्वारे करण्यात येत आहे.