Home राष्ट्रीय अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला!

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला!

0

गेल्या ५ महिन्यांपासून लॉकडाऊन चालू असल्याने कॉलेजेस बंद आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्या की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून वादविवाद चाललेला होता. हा मुद्दा कित्येक दिवसांपासून लांबणीवर पडला होता. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने ठाम निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पास करू नये व पदवी देऊ नये असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. तसेच परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात असेही सांगितले.

याशिवाय सर्व राज्यसरकारांना युजीसी च्या नियमांनुसार परीक्षा घेणे बंधनकारक असेल असेही कोर्टाने सांगितले. युजीसीने विद्यापीठांना ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची सूचना केली होती ती योग्य असल्याचे कोर्टाने सांगितले. तरीही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परीक्षा पुढे ढकलू शकते मात्र परीक्षा रद्द होऊ शकत नाहीत असा निर्णय कोर्टाने दिला.