Home आरोग्य पहा भारतात कुणाला मिळणार सर्वप्रथम covid-19 ची व्हॅक्सीन…

पहा भारतात कुणाला मिळणार सर्वप्रथम covid-19 ची व्हॅक्सीन…

0

कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे, या आजाराविरुद्ध लढण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. बऱ्याच देशातील लस तिसऱ्या टप्प्यात आहे. अशात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हॅक्सीनच्या ब्लू प्रिंटबद्दल माहिती दिली आहे. झी २४ तासच्या एका रिपोर्ट नुसार त्यांच म्हणणं आहे की, पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाची लस तयार होईल.

कोरोनाच्या या आणीबाणीच्या काळात आरोग्य मंत्र्यांनी भारतीय जनतेला दिलासादायक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार “४० ते ५० करोड कोविड-१९ व्हॅक्सीन तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. येत्या वर्षात जुलै २०२१ पर्यंत २० ते २५ करोड लोकांपर्यंत व्हॅक्सीन पोहोचवन्याचं लक्ष्य आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केलं आहे. त्याच बरोबर ते असही म्हणतात की, “राज्याला ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत अत्यावश्यक असणाऱ्या समूहाला सर्वप्रथम व्हॅक्सीन दिलं जाणार आहे.” त्याचबरोबर आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार, Covid-19 व्हॅक्सीनचं प्राधान्य आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार व्हॅक्सीनची खरेदी केंद्र सरकार करणार असून प्रत्येक व्हॅक्सीन ट्रॅक केलं जाणार आहे. भारतीय व्हॅक्सीन निर्मात्यांवर पूर्ण सरकारी मदत दिली जाणार आहे.