Home राजकीय फुटीरतावादी नेत्याला अटक; जम्मू-कश्मीरकडे सुरक्षा दलाचा मोठा ताफा रवाना.

फुटीरतावादी नेत्याला अटक; जम्मू-कश्मीरकडे सुरक्षा दलाचा मोठा ताफा रवाना.

0

प्राईम नेटवर्क : जम्मू-कश्मीरमध्ये राहून देशविघातक कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या बड्या फुटीरतावादी नेत्यांपैकी एक असलेल्या यासिन मलिकला शुक्रवारी रात्री उशीरा अटक कऱण्यात आली आहे. मलिक हा जम्मू-कश्मीर लिब्रेशन फ्रंटचा प्रमुख आहे. त्याच्या अटकेनंतर जम्मू-कश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी समर्थक पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

गृह मंत्रालायने सुरक्षा दलाच्या 100 तुकड्या येथे पाठवल्या असून मलिकनंतर इतर कोणत्याही फुटारतावादी नेत्याला अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. यासिन हा सैयद अली शाह गिलानी आणि मिरवाइझ उमर फारूक यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील संयुक्त प्रतिक्रियेचे नेतृत्व करतात. 35-A कलमाअंतर्गत जम्मू-कश्मीरमध्ये इतर कोणत्याही राज्यातील वा राष्ट्रातील व्यक्तीला अचल संपत्ती खरेदी करण्यास मनाई आहे. संविधानाच्या याच कलमाला सर्वौच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे.

सोमवारी जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या या कलम 35-Aवर संविधानसर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर सुनावणीच्या आधी यासिनला अटक होणे ही महत्वाची घटना समजली जात आहे. यासिनला श्रीनगर मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर चौकशीसाठी त्याला कोटीबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

दरम्यान, जम्मू-कश्मीरकडे सुरक्षा दलाच्या 100 तुकड्या रवाना झाल्याचे वृत आहे. यात सीआरपीएफचे 35 ,बीएसएफचे 35 , एसएसबीच्या 10, आयटीबीपीच्या 10 तुकड्यांचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये 22 फुटीरतावादी नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा व सरकारी सुविधा काढून घेण्यात आली आहे. तसेच येतील 155 राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थतेतही बदल करण्यात आला आहे, ज्यामध्ये यासिन मलिकचाही समावेश होता. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी या निर्णयाची निंदा केली आहे.