Home राष्ट्रीय गायिका कनिका कपूर कोरोना पोसिटीव्ह; पार्टीमध्ये आली अनेक लोकांच्या संपर्कात

गायिका कनिका कपूर कोरोना पोसिटीव्ह; पार्टीमध्ये आली अनेक लोकांच्या संपर्कात

0

‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. सध्या तिला लखनऊमधील रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण आता कनिका कपूरबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मीडियाच्या माहितीनुसार, कनिका कपूरला करोनाची लक्षणे असून सुद्धा ती एका हॉटेलमध्ये डिनर पार्टी करत होती. या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र भाजपचे खासदार दुष्यंत सिंहसुद्ध उपस्थित होते. रविवारी ही पार्टी झाली आणि त्यानंतर ते लंडनहून भारतात परतले.  त्यामुळे करोनाग्रस्त असलेल्या कनिक कपूरच्या संपर्कात आल्यामुळे या मायलेकांनाही आता क्वारंटाईन व्हावे लागत आहे.

कनिका कपूर ने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून कोरोना ची माहिती दिली, “माझी करोना संदर्भातील चाचणी घेतली असून माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी आणि माझे कुटुंबीय आयसोलेशनमध्ये आहोत. सध्या करोनाचा सामना यापुढे कसा करायचा यासंबंधी डॉक्टरांच्या सल्लाचे पालन करित आहोत. ज्यांच्याशी माझा संपर्क झाला आहे, त्यासंदर्भात सध्या माहिती घेतली जात आहे. १० दिवसांपूर्वी मला विमानतळावर तपासण्यात आलं होतं. “नुकतचं एएनआय या वृत्तसंस्थेने देखील कनिकाच्या संदर्भात ट्विट केलं आहे. ट्विट करताना एएनआयने तिचं नाव सांगितलं नाही. उत्तप्रदेशमध्ये आज करोना चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बॉलिवूड गायिकेचा देखील समावेश आहे, अशाप्रकारे एएनआयने ट्विट केलं आहे. 

लखनऊमध्ये कनिका ज्या ठिकाणी राहते तिथं ७०० फ्लॅटस् आहेत. कनिका ज्या सोसायटीमध्ये राहते तिथं भितीचं वातावरण आहे. तिच्या संपर्कात जे लोक आले त्यांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.