Home राष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या स्टँड अप कॉमेडीयनला तात्काळ अटक करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या स्टँड अप कॉमेडीयनला तात्काळ अटक करा

0

स्टँडअप कॉमेडी कलाकार अग्रीमा जोशुआ हिने महाराजांची केलेली टिंगल टवाळी बघून सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे, तिच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी नेटिझन्स करत आहेत.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अग्रीमा जोशुआ ज्या कॅफे मध्ये तिचे शो करते त्याची संपूर्ण तोडफोड करण्यात आली असून, तिने लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली होती. अग्रीमा हिने तात्काळ माफीनामा लिहून माफी मागितली असल्याचे कळते.

अग्रीमाणे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, ” कुणालाच महाराजांविषयी अपशब्द बोलण्याचा अधिकार नाही, त्यांच्याविषयी अशी विधाने करणे म्हणजे महाराष्ट्राचा आणि महाराजांचा अवमान आहे”, आशा शब्दात संताप व्यक्त केला जात आहे.

काय म्हणाली होती अग्रीमा, ” मी शिवाजीच्या पुतळ्याचे सर्च करण्यासाठी quora app ज्यावेळी उघडले तेव्हा मला दिसले की, कुणीतरी एकजण निबंध लिहिला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की शिवाजीचा पुतळा हा मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक असून त्याच्या डोळ्यात लेझर लाईट लावण्यात येणार आहेत, ह्या लाईट मधून पाकिस्तान मधून येणाऱ्या दहशतवादीवर नजर ठेवण्यात येईल. दुसऱ्या एकाने असे लिहिले की शिवाजी म्हणू नका शिवाजी महाराज म्हणा, मी त्याला फॉलो केले”.

http://www.facebook.com/story.php?story_fbid=1671273866382927&id=248377068672621&scmts=scwspsdd&extid=HAwhcRa8aoMauWp7

अग्रीमाच्या महाराजांना एकेरी नावाने संबोधन केल्यामुळे संतापाची लाट उसळली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकते यश रानडे यांनी त्या कॅफेची तोडफोड करत असल्याचा व्हिडिओ फेसबुक वर टाकला आहे.