Home तंत्रज्ञान आता केबल TV द्वारे मिळणार इंटरनेट, सरकारमार्फत मार्गदर्शक तत्वे जारी

आता केबल TV द्वारे मिळणार इंटरनेट, सरकारमार्फत मार्गदर्शक तत्वे जारी

0

आपण Tv च्या केबल लाईन मधून लवकरचं इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकणार आहोत. या संबंधी सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली असून लवकरचं ही संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याचे कळते. डीसीसी अर्थात डिजिटल कम्युनिकेशन कमिशन लवकरच एजीआर आणि परवाना शुल्काबाबत निर्णय घेईल. या आठवड्यात डीसीसी बैठक घेऊ शकते. कोविड – 19 मुळे देशात घरून काम सुरू आहे. लँडलाइन ब्रॉडबँडची संख्या कमी झाल्याने नेटवर्कमध्ये अडचण आहे.

कोरोनामुळे लागू झालेला lockdown मध्ये ब्रॉडबँड कनेक्शन मध्ये 50% वाढ झाली आहे, यामधून इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन साठीची मागणी वाढती आहे हे नक्की.

दरम्यान लोकडाऊन मध्ये घरून काम करत असताना मोबाईल, कॉम्प्युटर आणि इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र लाईट नसल्याने फोन चार्ज करणे किंवा कॉम्प्युटर चालवणे अवघड झाले आहे. तर पावसामुळे पुरेशा क्षमतेने नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने ऑनलाइन काम करणे किंवा डेटा पाठवण्यात अनेक अडचणी येत आहेत. फोन रिस्टार्ट करून किंवा इंटरनेट चालू-बंद केल्याने इंटरनेटचे स्पीड वाढते. त्यामुळे कामात अडचणी निर्माण झाल्यास नोकरदार आणि नेटकरी सारखे फोन रिस्टार्ट करत असून त्यामुळे मोबाइलची बॅटरी देखील उतरत आहे. अशा स्तिथीमध्ये ब्रॉडबँड नेट कनेक्शन नवीन क्रांती आणू शकते का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे!