Home राष्ट्रीय जेएनयू मध्ये रविवारी जोरदार हाणामारी: विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

जेएनयू मध्ये रविवारी जोरदार हाणामारी: विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

0

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात अर्थात JNU मध्ये काल रविवारी जोरदार हाणामारी झाली आहे. दरम्यान जेएनयू स्टुडंट युनियनची अध्यक्ष आयेषी घोष हिच्यावर हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही बुरखाधारी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. केवळ घोष यांच्यावर नाही तर या हल्ल्यात काही शिक्षक व जवळपास वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अमित शहा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत व कॉलेज परिसर पोलिसांच्या निगरणीत आहे.

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडूनच हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात असून पोलिसांनी यात बघ्याची भूमिका घेतल्याचं देखील विद्यार्थी सांगत आहेत. परिणामी कॉलेज कॅम्पसमध्ये आता अभ्यासाचं वातावरण राहीलं नसून विद्यार्थी भीतीपोटी घरी निघून जात आहेत.