Home राष्ट्रीय १५ जुलैला सर्वोच्च न्यायालय ठरवणार मराठा आरक्षणाचे भवितव्य

१५ जुलैला सर्वोच्च न्यायालय ठरवणार मराठा आरक्षणाचे भवितव्य

0

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणसंबंधी सुनावणी संपली असून अंतरिम आदेश देण्याकरिता १५ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा अंतरिम आदेश व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून देऊ शकत नसल्यामुळे १५ जुलै ही तारीख ठरविले असल्याचे सुप्रीम कोर्टाने जाहीर केले. छत्रपती संभाजी राजे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून दोन्ही बाजूंना लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशात मराठा आरक्षण लागू व्हावे की नाही यासाठी सर्वोच्च न्यायालय अंतरिम आदेश काढणार असून याचिकाकर्ते आरक्षणाला स्तगिथि मिळणार नाही याबाबत ठाम आहेत.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला नोकरीमध्ये आणि शिक्षणात १६% आरक्षण देण्यात आले होते. हे आरक्षण OBC आरक्षणाला धक्का न लावता वेगळे EBC म्हणून देण्यात आले होते. १ डिसेंबर २०१८ ला लागू झालेले आरक्षण हे उच्च न्यायालयाने स्तगीथि देत रद्द केले होते, सदर च्या बाबीनंतर सर्वोच्च न्यायालयात हा खटला चालवण्यात आला आहे.