Home राष्ट्रीय वर्षाची दुःखद सुरवात : जम्मू-काश्मीर येथील नौशेरा सेक्टरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद…

वर्षाची दुःखद सुरवात : जम्मू-काश्मीर येथील नौशेरा सेक्टरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद…

0

जम्मू-काश्मीर येथील नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये बुधवारी 1 जानेवारी अर्थात आज चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत अशी महिती माहिती आहे. ANI या वृत्त संस्थेने आपल्या ट्विट द्वारे ही माहिती दिली.

मीडिया रिपोर्ट नुसार जम्मू-काश्मीर येथील नौशेरा सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती, परिणामी तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्याच दरम्यान सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये चकमक चालू झाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला घेराव घातला होता. यावेळी दोन जवान शहीद झाले आहेत अशी बातमी लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार मिळत आहे.  सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील त्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.