Home राष्ट्रीय देशातील मोठी कंपनी होणार बंद! काय होणार कामगारांच?

देशातील मोठी कंपनी होणार बंद! काय होणार कामगारांच?

0

लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या 70 ते 90च्या दशकात प्रसिद्ध असणाऱ्या स्कूटर लैमरेटाला बनवणारी सरकारी कंपनी स्कूटर इंडियाला बंद करण्याची तयारी सध्या सुरू आहे.

या कंपनीमध्ये 93.87% सरकारची भागीदारी असून 5% बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज शेयर मध्ये लावण्यात आला आहे. सुरुवातीला कंपनीने याची पूर्ण हिस्सेदारी विकण्याची तयारी केली होती असे सीनबीसी कडून मिळालेल्या माहितीनुसार समजले आहे. परंतु पूर्ण कंपनी विकत घेण्यासाठी कोणीही समोर न आल्यामुळे आता ती वेगवेगळ्या हिस्यांमध्ये विकली जाणार आहे.

स्कूटर्स इंडियाला बंद करण्यासाठी गृहमंत्रालयाने प्रस्ताव मांडला आहे.ही सर्व जमीन विकण्याचा निर्णय झाला आहे तसेच ही जमीन उत्तरप्रदेश सरकारला परत केली जाईल आणि त्याचे मशीन आणि प्लॅन्स विकले जाणार आहे.

तसेच मिळालेल्या पैशांचा उपयोग कामगारांच्या VRS मध्ये केला जाईल. त्याआधी कंपनीला शेयर बाजारातून डिलिस्ट केलं जाईल.