Home राष्ट्रीय म्हणून पायलट अभिनंदन यांना पाकने सोडलं, अभिनंदन यांना सोडणं हि पाकची मजबुरी

म्हणून पायलट अभिनंदन यांना पाकने सोडलं, अभिनंदन यांना सोडणं हि पाकची मजबुरी

0

प्राईम नेटवर्क : भारताचा पायलट अभिनंदन यांना सोडणं, हि पाकिस्तानची मजबुरी आहे. पाक पंतप्रधान इमरान खान यांनी अनेकदा, आपल्याला युद्ध नको शांती हवी असं म्हणत आपण जगातील मोठे शांतिदूत असल्याचा देखावा केला आहे. भारत पाकिस्तानच्या इतिहासात, कारगिल युद्धा वेळी पाकिस्तानने अनेक भारतीय सैनिकांचा अमानवी छळ करत, त्यांची नखे काढली, डोळे काढले, डोक्यावरचे केस उपटून काढले, जिवंतपणी चामडी सोलली गेली.

पायलट अभिनंदन यांच्या सोबत असा मूर्खपणा केला नाही

परंतु यावेळी पाकिस्तानने भारतीय पायलट अभिनंदन यांच्या सोबत असा मूर्खपणा केला नाही, त्याला कारण भारताची कूटनीती चाल होती, पाकिस्तान पुन्हा पुन्हा ओरडून सांगतोय कि, त्यांना युद्ध नको, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या कडे युद्धापुरते पुरेसे पैसेच शिल्लक नाहीत. असं असताना पायलट अभिनंदन यांना जर पाकने ताब्यात ठेवलं किंवा त्यांचा छळ केला, तर भारत पुढील दहा दिवसात पाकिस्तानचे दहा सैनिक जिवंत पकडू शकतो, आणि ती परिस्थिती पाकिस्तानला हाताळणं अवघड गेलं असतं, पाकिस्तान युद्धाच्या गर्तेत अडकला असता, पाकिस्तान बरोबर होत्याचं नव्हतं होण्यासाठी वेळ लागला नसता.

पायलट अभिनंदन यांना विना अट सोडण्यासाठी भारताने इशारा दिला होता

पायलट अभिनंदन यांना विना अट सोडण्यासाठी भारताने इशारा दिला होता. त्या इशाऱ्या कडे दुर्लक्ष करणं पाकिस्तानला महागात पडलं असतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पायलट अभिनंदन यांचा घटनाक्रम पोहचला होता. पायलट अभिनंदन यांना पाक ने आपल्या ताब्यात ठेवलं असतं, तर बाकीचे मुद्दे बाजूला होऊन, हाच मुद्दा जगा समोर आला असता.

त्यांचं कर्तव्य बजावत असताना त्यांचं विमान पाकिस्तान हद्दीत पडलं होतं

दुसरीकडे जिनिव्हा करारा नुसार पायलट अभिनंदन हे स्वतःहून पाकिस्तान हद्दीत गेले नव्हते, तर त्यांचं कर्तव्य बजावत असताना त्यांचं विमान पाकिस्तान हद्दीत पडलं होतं. हा मुद्धा भारताने रेड क्रॉस संस्थेकडे मांडल्यावर पाकिस्तानला जाग आली. पायलट अभिनंदन यांना आपल्याकडे ठेवणं म्हणजे युद्धाला आमंत्रण देण्या सारखं होतं, हे पाकिस्तानच्या लक्षात आल्यावरच पायलट अभिनंदन यांना मुक्त करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला.

या मुळेच पाकिस्तान पुन्हा पुन्हा ओरडून सांगतोय आम्हाला युद्ध नको शांती हवी 

मागील ७० वर्षात पाकिस्तानची मस्ती अशा पद्धतीने भारताने जिरताना पहिली नव्हती, या आधी प्रत्येक वेळी पाक भारताला युद्धाच्या धमक्या द्यायचा, सीमेवर छोटे मोठे हल्ले करायचा. ते कमी पडतं कि काय म्हणून काश्मीर आणि पूर्ण भारतात दहशतवाद पसरवायचा. मात्र भारताने प्रथमच असा मार्ग निवडल्यावर पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानची सध्याची डब घाईला गेलेली अर्थ व्यवस्था, या मुळेच पाकिस्तान पुन्हा पुन्हा ओरडून सांगतोय आम्हाला युद्ध नको शांती हवी आहे. हा एक प्रकारे भारतीय कूटनीचाच विजय मानायला हवा.