Home राष्ट्रीय काश्मीरमधील जमात-ए-इस्लामविरोधात प्रमुख कारवाई,आघाडीच्या नेत्यांना केली अटक.

काश्मीरमधील जमात-ए-इस्लामविरोधात प्रमुख कारवाई,आघाडीच्या नेत्यांना केली अटक.

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून दक्षता बाळगली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने जम्मू काश्मीर फ्रंटचा प्रमुख यसिन मलिक आणि याचसोबत जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल हमीद फयाज याच्यासह दोन डझनहून अधिक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले.

केंद्र सरकारकडून दहशतवाद्यांविरोधात कडक पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राने सुरक्षा दलातील 100 अतिरिक्त कंपन्यांना पाचारण करण्याचे आदेश दिले आहेत. या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या खोऱ्यात ही कारवाई करत अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. या सर्व दहशतवाद्यांचा जमात-ए-इस्लामीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांनी व इतर एजन्सींनी मोठ्या प्रमाणात अटक केली आणि व्हॅलीतील अनेक घरांवर छापा टाकला, ज्यामध्ये डझनभर केंद्रीय आणि जिल्हास्तरीय नेत्यांना अटक करण्यात आली, त्यात अमीर (मुख्य) डॉ. अब्दुल हमीद फयज आणि वकील जहिद अली (प्रवक्ते) यांचा समावेश आहे. उत्तर,दक्षिण आणि मध्य काश्मीरमधून जमात संघटनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या निवासस्थांनातून अटक केली.

पी.पी.सदाद लोन यांनी याबाबत असे म्हटले आहे की “भूतकाळातील अशा क्रॅकडाउनना कोणतेही परिणाम मिळाले नाहीत.1990 दरम्यान अशीच घटना घडली होती पण त्यातून काहीही सिद्ध झाले नाही. त्यामुळे निराश होऊ नका.”

दरम्यान या कारवाईबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिक माहिती देण्यात आली नाही.