Home राष्ट्रीय पदवीधारकांना उच्च न्यायालयात चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पदवीधारकांना उच्च न्यायालयात चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

0

लॉकडाऊनमुळे कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच अनेक पदवीधारकांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे. अशातच ग्रॅज्युएशन पूर्ण असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार राजस्थान उच्च न्यायालयात क्लार्क व असिस्टंटच्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना एक परीक्षा द्यावी लागणार आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या www.hcraj.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. मार्च २०२० मध्ये सुरू होणार असलेली ही भरती प्रक्रिया लॉकडाऊनमुळे रखडली होती. ती आता १ ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्यूडीशीयल असिस्टंटच्या पदासाठी २६८ जागा, ग्रेड २ च्या क्लार्कसाठी ८ जागा, ज्युनियर असिस्टंट १८ जागा, डिस्ट्रिक्ट कोर्ट – नॉन टीएसपी ग्रेड २ क्लार्कच्या १०५६ जागा व इतर ४०० जागा असे मिळून एकूण १,७६० पदे रिक्त आहेत.

पात्रता अटी:
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार १८-४० वर्ष वयोगटातील व मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीप्राप्त असणे अनिवार्य आहे.

या पदांमध्ये प्रति महिना २०,८०० रुपयांपासून प्रति महिना ६५,९०० रुपयांपर्यंत पगार मिळण्यास वाव आहे.

अर्ज प्रक्रिया:
या भरतीचा अर्ज दाखल करण्यासाठी https://hcraj.nic.in/hcraj/recruitment_detail.php?id=MzA=&_ga=2.117746889.1300797954.1602381406-763477693.1584512576 या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर संकेतस्थळावरील ‘HCRAJ clerk notification 2020’ यावर क्लिक करा व अर्ज भरा.
हा अर्ज दाखल करण्यासाठी जनरल, ओबीसी, इडब्ल्यूडी साठी ५०० रुपये शुल्क असून राजस्थानच्या एससी, एसटी गटातील व दिव्यांग उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर असून अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर आहे.