Home महाराष्ट्र मुंबई “कसाब हा हिंदू आणि २६/११ चा हल्ला हा हिंदू दहशतवाद असं भासवायचं...

“कसाब हा हिंदू आणि २६/११ चा हल्ला हा हिंदू दहशतवाद असं भासवायचं होतं”: राकेश मारिया

0

“२००८ मध्ये मुंबई हल्ल्यामागची ‘लष्कर ए तएबा’ ही दहशतवादी संघटना हा हल्ला हिंदूत्ववादी हल्ला दर्शवण्याच्या बेतात होती!”

माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात अजमल कसाब हा समीर चौधरी या नावाने मरण पावणार होता असा धक्कादायक दावा केला आहे. या पुस्तकातील संदर्भानुसार, “पाकिस्तानी गुप्तचर संघटना, लष्कर ए तएबा यांनी त्यांच्या विरुद्ध जिवंत पुरावा असणाऱ्या ‘कसाब’ ला कोठडीत संपवण्याची पराकाष्टा केली, आणि याची जबाबदारी त्यांनी दाऊद इब्राहिम टोळीवर टाकलेली होती!”

२६/११ च्या हल्ल्यामागच्या नियोजनाबद्दल त्यांनी पुढील प्रमाणे टिप्पणी केली आहे : “जर सर्व काही ठरवल्या प्रमाणे झाले असते तर मृत अजमल कसाब हा बंगळुरू मधील समीर चौधरी या नावाने ओळखल्या गेला असता आणि माध्यमांनी हल्ल्यामागे हिंदू दहशतवादी असल्याचा पाठपुरावा केला असता.”

या पुस्तकामध्ये त्यांनी शाहिद तुकाराम ओंबळे यांच्या धाडसाचे कौतुक सुद्धा केले आहे.