१०६ वर्ष जुना अयोध्यावाद आणि त्यावर चालू असणारा खटला आज निकाली लागणार आहे. अयोध्येतील जमीन मालकीच्या वादातून चालू असणारा हा वाद आज कायमचा मार्गी लागेल. आज सकाळी १०:३० वाजता सर्वोच्च न्यायालय या खटल्याची सुनावणी करणार असून सबंध भारतीयांच या निकालाकडे लक्ष वेधलं आहे. या दरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी शासन विशेष काळजी घेत आहे. रजेवरील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ परत कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्याप्रमाणे चोख बंदोबस्त करण्यात आला आहे
आज या निकालाची सुनावणी होणार असल्याने कालपासूनच देशभरात काटेकोर बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे अतिदक्षता बाळगण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. सोशल मीडियासह बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात आलं आहे. कुठेही कुठलीही गैरवर्तवणूक निदर्शनात आल्यास ताबडतोब कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणचे विशेषतः रेल्वे स्टेशन वरील सर्व cctv कॅमेरे नीट काम करत आहेत का हेही तपासण्यात आलं आहे.