Home राष्ट्रीय १ सप्टेंबरपासून होणार हे मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर!

१ सप्टेंबरपासून होणार हे मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर!

0

१ सप्टेंबर अर्थात उद्यापासून आपल्या दैनंदिन आयुष्यात बरेच बदल होणार आहेत. LPG सिलेंडर, EMI, Home loan, विमान प्रवास अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होणार असल्याचे मीडिया न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे.

लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार उद्यापासून होणारे मुख्य बदल पुढीलप्रमाणे:

  • १ सप्टेंबरपासून LPG, CNG, PNG च्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच LPG सिलेंडरचे दर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • १ सप्टेंबरपासून विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. कारण देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवाश्यांना ASF आकारण्याचा निर्णय नागरी उड्डान मंत्रालयाने घेतला आहे. तसेच स्थानिक प्रवाशांसाठी ₹१५० ऐवजी ₹१६० इतका ASF आकारला जाणार आहे.
  • कर्जाच्या EMI ची परतफेड करायची असलेल्या ग्राहकांची मुदत उद्या ३१ ऑगस्टला संपणार आहे.
  • इंडिगो एयरलाईन्स उद्यापासून कोलकाता, प्रयाग, सुरत साठीची विमाने आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवसांसाठी सुरू करणार आहे. या विमानांचे वेळापत्रक जाहीर झाले असून उद्यापासून बुकिंगला सुरुवात होणार आहे.
  • ओला-उबर चालकांनी उद्या दिल्लीमध्ये संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.