Home राष्ट्रीय कामगारांचे पगार ज्यांनी कमी केले किंवा काढून टाकले त्यांच्याविरुद्ध कारवाई करू नका...

कामगारांचे पगार ज्यांनी कमी केले किंवा काढून टाकले त्यांच्याविरुद्ध कारवाई करू नका : सर्वोच्च न्यायालय

0

देशावरील कोरोना विषाणूचे संकट आल्याने लॉकडाऊन जाहीर झाला आणि अनेक उद्योग-धंदे गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहेत. रोजगार नसल्याने कामगारही हवालदील झालेत. काही कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत. दरम्यान, ज्या कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध सुनावणी होईपर्यंत कारवाई करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालय दिले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांना मोठा दिलासा मिळालाआहे. पुढील सुनावणी ही १२ जूनला होणार आहे.

लॉकडाऊन दरम्यान देशातील उद्योजकांनी कामगारांना कामावरुन कमी करु नये तसेच त्यांचे पगार कापू नये, असे आदेश जारी करण्याची सूचना देणारे पत्र केंद्रीय श्रम मंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहीले होते. या निर्देशांचे उल्लंघन करणऱ्या उद्योजकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने
आपल्या निर्देशात म्हटले होते.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे बंद झाल्याने अनेक लहान आणि मध्यम उद्योजकच आर्थिक अडचणीत सापडले असून ते कामगारांचे पगार देण्याच्या स्थितीत नसण्याची शक्यता आहे.तसेत सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणी करणारी याचिका उद्योजक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर निर्णय देताना तूर्तास लगेच कारवाई करु नका, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे