Home राष्ट्रीय स्मार्टफोन घेण्यासाठी वडिलांनी गाय विकल्याच्या बातमीचे सत्य सर्वांसमोर

स्मार्टफोन घेण्यासाठी वडिलांनी गाय विकल्याच्या बातमीचे सत्य सर्वांसमोर

0

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण आवश्यक असल तरी छोट्या गावातील सोयी उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण घेण कठीण झालं आहे; त्यातच एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील गुंमर येथील रहिवाशी असलेल्या कुलदीप कुमार नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गाय विकली आणि त्यातून मिळालेल्या ६ हजार रुपयांतून मुलीला शिक्षणासाठी स्मार्टफोन खरेदी करून दिला. ही बातमी उघडकीस आल्यानंतर अनेक लोकांनी या कुटुंबाला मदत केली, हे बघून अभिनेता सोनू सूद यांनीही मदतीसाठी ईच्छा व्यक्त केली.

हि बातमी कळल्यानंतर अनेक लोकांनी या कुटुंबाला हजारो रुपयांची मदत केली. हे समजल्यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने गावात जाऊन या प्रकरणाची पाहणी केली.

बातमी समोर आल्यानंतर समजलं की कुलदीप कुमार यांच्याकडे ७ जनावरे असून तीन महिन्यांपूर्वी त्यांनी गाय विकली. पण त्याआधीच शिक्षणासाठी त्यांनी मुलीला स्मार्टफोन घेऊन दिला होता असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तपासणी नंतर सांगितले. कुलदीप हे दुधविक्रीतून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असुन त्यांच्याकडे ७ जनावरे आहेत. पण त्यांच्याविषयी अशी माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने मदतीसाठी या गावाकडे धाव घेतली.

कुलदीप कुमार यांच्या घराजवळ सरकारी शाळा असून सुद्धा त्यांची मुले खाजगी शाळेत शिक्षण घेतात असे निदर्शनास आले आहे. त्यासोबतच ते मुलांसाठी आवश्यक ती महागडी पुस्तके खरेदी करतात. प्रशासन अधिकाऱ्यांनी बातमी ची दखल घेताच समजले की कुटुंबामध्ये भांडणाचे वातावरण आणि तणाव असल्यामुळे ते कुटुंब सद्य स्थितीत गोठ्या मध्ये राहत आहे. प्रशासनाने प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. पावसाळ्यामध्ये गोठ्यात जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी १० जुलै रोजी त्यांची गाय ६ हजार रुपयांना गावातील सुरेंद्र मोहन यांना विकली.

राहण्यासाठी घर नसल्याने अलीकडेच पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरासाठी पात्र ठरण्याच्या यादीमध्ये त्यांचे नाव आले आहे अशी माहिती पंचायत समिती कडून देण्यात आली आहे. ही बातमी पाहिल्यानंतर जिल्हा प्रशासकीय अधिकारी राकेश प्रजापति यांनी तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना माहिती घेण्यास पाठवले. तेव्हा ही सगळी माहिती समोर आली.