Home राष्ट्रीय प्रतीक्षा संपली! सलून सह सर्व दुकाने उघडण्यास मुभा, वाचा काय काय सुरू...

प्रतीक्षा संपली! सलून सह सर्व दुकाने उघडण्यास मुभा, वाचा काय काय सुरू होणार (लॉकडाऊन 4.0)

0

काल केंद्र सरकारने कोरोना साठी चौथा लॉकडाऊन जाहीर केला, मार्च २४ ला जाहीर झालेला पहिला लॉकडाऊन आता चौथ्या टप्प्यात वाढवत ३१ मे पर्यंत करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन 4.0 च्या घोषणेनंतर काही क्षणातच गृह मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

मे १८ ते ३१ मध्ये काय सुरू राहील आणि काय बंद:

(१) मेट्रो, रेल्वे(श्रमिक सोडून) सेवा पूर्णपणे बंद.
(२) कंटेन्मेंट झोन आणि मॉल्स सोडून सर्व दुकाने उघडी.
(३) नाव्ह्याची दुकाने सलून उघडे राहणार.
(४) ऑनलाइन माध्यमातून अत्यावश्यक सेवांची विक्री सुरू राहणार.
(५) उपहारगृहे सुरू होणार पण फक्त टेक अवे माध्यमातून
(६) कुठलीही धार्मिक व राजकीय सभेवर पूर्ण बंदी
(७) लग्नसोहळ्यात ५० पेक्षा जास्त तर मयतीला २० पेक्षा जास्त लोक नाही.
(८) मास्कचा वापर बंधनकारक
(९) रात्रीला पूर्णपणे कर्फ्यू लागणार (रात्री ७ ते सकाळी ७)
(१०) वयोवृद्ध व्यक्ती (६५+) आणि गरोदर मातांना घर सोडण्यास बंदी.
(११) शाळा कॉलेज यांना सुरू राहण्यास मनाई.