Home राष्ट्रीय ‘आम्ही दहशतवादाविरुद्ध लढ्यात एकत्र आहोत’ – सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान.

‘आम्ही दहशतवादाविरुद्ध लढ्यात एकत्र आहोत’ – सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान.

0

प्राईम नेटवर्क : भारत व सौदी अरेबियामध्ये 20 फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान भारत व सौदीमध्ये दोन्ही देशांना उपयुक्त असे पाच करार झाले. तसेच मोहम्मद बिन सलमान यांनी दहशतवाद संपविण्यासाठी पूर्ण सहकार्य करू असेही सांगितले.

दोन्ही देशांमध्ये झालेले महत्त्वपूर्ण करार
– ऊर्जा करार
– पर्यटन क्षेत्रात एमओयूवर स्वाक्षऱ्या
– द्विपक्षीय व्यापारासंबंधी करार
– प्रसार भारती व सौदी अरबमध्ये प्रसारणसंबंधी करार
– आंतरराष्ट्रीय सौरऊर्जेसंबंधी करार

सौदी अरेबिया भारतात 100 अब्ज डॉलर्स (7.1 लाख कोटी रुपये) गुंतवेल. एक दिवसापूर्वी त्यांनी पाकिस्तानसोबत 20 बिलियनचा करार केला होता. मोदींच्या मागणीनुसार,क्राउन प्रिन्सने 850 भारतीय कैद्यांना सोडण्याची मागणी केली.  पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबात सलमान यांनी कोणतेही उद्गार काढले नाही. पण दहशतवाद संपविण्यासाठी आम्ही भारताला संपूर्ण सहकार्य करू असेही सांगितले.

एका निवेदनात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “प्रिन्स सलमानचे भारताच्या पहिल्या भेटीचे स्वागत आहे. दोन्ही देशांतील संबंध जवळचे आणि जुने आहेत. आपल्या मार्गदर्शनासह,आमच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये काही गोडपणा आला आहे. एकविसाव्या शतकात, सौदी अरेबिया भारतासाठी ऊर्जाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.”

दरम्यान क्राउन प्रिन्स म्हणाले, “भारतातील शिष्टमंडळ प्रमुख म्हणून हा माझा पहिला दौरा आहे. गेल्या 50 वर्षांत दोन्ही देशांनी ताकद वाढवली आहे. आपण शेती आणि उर्जेत पुढे जाऊ शकतो. उग्रवाद आणि दहशतवादांवर आपले विचार समान आहेत.आम्ही भविष्यातील पिढ्यांसाठी चांगले भविष्य सुनिश्चित करू. निमंत्रणासाठी आम्ही आभारी आहोत. “