काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने सर्व ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स सेल सुरु आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल्स अशा सर्वच वस्तूंवर घवघवीत ऑफर्स मिळत आहेत. शिवाय सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक ऑनलाईन खरेदीवर भर देत आहेत. अशातच सगळ्यात प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग साईट ऍमेझॉनवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केल्या जात आहे. या आरोपामुळे ट्विटरवर बॉयकॉट ऍमेझॉन हा हॅशटॅगही ट्रेंडिंग वर आहे.
याचे कारण म्हणजे अमेझॉनच्या साईटवर हिंदू देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे, पायपुसण्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. तसेच या वस्तू भारताबाहेर इतर देशांमध्ये विकल्या जात आहेत. यामुळेच परदेशातील भारतीयांनी ट्विटरवर बॉयकॉट ऍमेझॉन हा हॅशटॅग वापरत प्रखर टीका केली जात आहे. मीडिया न्यूजनुसार अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये हिंदू देवीदेवतांची फोटो विविध वस्तूंवर छापले जातात. हाफ पँट्स, अंडरवेअर, पायपुसण्या, बूट अशा वस्तूंचाही त्यात समावेश आहे. या वस्तू आता ऍमेझॉनवर विकल्या जात असल्याने हिंदूंनी अमॅझॉनवर बहिष्कार टाकण्याचा नारा लावला आहे.