ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वाइन शॉप किंवा पानाच्या टपरीवर कमीत कमी सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. पाचपेक्षा जास्त माणसं एकावेळी या शॉपमध्ये असू नयेत असंही सांगण्यात आलं आहे.
पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये संपूर्ण तर ऑरेंज झोन मध्ये सशर्त वाइन शॉप सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले निर्देश दिले आहेत.
वाइन शॉप्स, पानाची दुकानं ग्रीन झोनमध्येच पूर्ण उघडली जाणार असली तरी ऑरेंज झोन मध्ये या ग्रीन झोन मध्ये राज्यातील उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, मॉल्स आणि मार्केटिंग कॉम्प्लेक्स मधील वाईन शॉप्सना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या व्यतिरीक्त इतर ठिकाणी असलेल्या दुकांना परवानगी देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला साधारणपणे तीन कोटी लिटर देशी दारू, अडीच कोटी लिटर बिअर, पावणेदोन कोटी लिटर विदेशी मद्य, आणि साधारणपणे सहा ते सव्वा लाख लिटर वाईनची विक्री होते आणि एका महिन्याला साधारणपणे उत्पादन शुल्क खात्याला बाराशे कोटी रुपयांचा महसूल मिळतो आणि त्यावर साधारणपणे ८०० कोटी रुपयांचा विक्रीकर सुद्धा गोळा केला जातो. अर्थात हे आकडे दर महिन्याला बदलत असतात.