Home राजकीय भाजप नेत्याच्या कानशिलात लगावल्याने महिला उपजिल्हाधिकारी सोशल मीडियावर लोकप्रिय : नावाचा हॅशटॅग...

भाजप नेत्याच्या कानशिलात लगावल्याने महिला उपजिल्हाधिकारी सोशल मीडियावर लोकप्रिय : नावाचा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये

0

एकीकडे केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए विरोधात विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला जात आहे. याच्या विरोधात लहान मोठ्या शहरांमधून नागरिक मोर्चे, आंदोलनं करीत आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील राजगढ येथे रविवारी सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. दरम्यान घोषणाबाजी देखील चालू होती. या मोर्चाच्या दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. सकाळ माध्यमाच्या एका रिपोर्ट नुसार उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा या मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करीत असतांना काही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की करत त्यांचे केस देखील पकडले. शेवटी उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनीही कार्यकर्त्यांना ढकलून एका भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली.

या घटनेनंतर काल रविवार पासूनच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पेटली. केवळ चर्चा नाही तर उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचं नेटकाऱ्यांकडून कौतूक केलं जातं असून #प्रियावर्माजिंदाबाद हा ट्विटरवर ट्रेंड सुरु आहे.