Home आरोग्य सोशल मीडिया वर कोरोनाग्रस्तांच नाव जाहीर करताय? सावधान! होऊ शकतो तुरुंगवास!

सोशल मीडिया वर कोरोनाग्रस्तांच नाव जाहीर करताय? सावधान! होऊ शकतो तुरुंगवास!

0

कोरोना ने बाधित रुग्णांची नावे अतिउत्साहाच्या भरात सोशल मीडियावरुन उघड करताना सावधगिरी बाळगा, कारण रुग्णांची ओळख उघड करत असणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.
 कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. पण जर ह्या रुग्णांची नावं उघड झाल्यास विनाकारण अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास होऊ शकतो, असं मत डॉ. म्हैसेकरांनी मांडले.

रुग्णांच्या कुटुंबीयांना समाजाकडून खूप वाईट वागणूक मिळत आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास किंवा फिरण्यास आणि पाणी भरण्यास सुद्धा मज्जाव केला जात आहे. सर्व कामे घरातूनच करावी, घरातील भांडी आणि धुण्याचे पाणीसुद्धा बाहेर फेकू नये, असं बजावलं जात आहे. समाजाकडून अशा हीन प्रकारची वागणूक फक्त एकाच कुटुंबाला नाही तर अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांना दिली जात आहे, असा दावा वकील किशोर पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.