Home राजकीय भाजपच्या पदरात सलग पाचव्यांदा पराभव; झारखंड विधानसभेत काँग्रेसची बाजी तर भाजप पराभूत

भाजपच्या पदरात सलग पाचव्यांदा पराभव; झारखंड विधानसभेत काँग्रेसची बाजी तर भाजप पराभूत

0

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचा दणदणीत पराभव झाला आहे. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय जनता दल या पक्षांच्या आघाडीला बहुमत मिळाल्याने भाजपच्या पदरात अपयश पडले आहे. भाजपचे नेते असलेले झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांचादेखील या निवडणुकीत पराभव झाला. या निकालानंतर देशात सत्तेवर असलेल्या भाजपने आणखी एक राज्य सत्तेतून गमावल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

झारखंड मध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली असून यापैकी ४७ जागा काँग्रेस-झामुमो व राष्ट्रीय जनता दल या आघाडीला मिळाल्या असून भाजपला केवळ २६ जागा मिळवणे शक्य झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला देखील झारखंडमध्ये एक जागा मिळाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांत सत्ता गमावल्यानंतर आता भाजपचा झारखंडमध्ये देखील पराभव झाल्यामुळे इतर पक्षांतील नेते भाजपवर निशाणा साधत आहेत.