Home राजकीय ” ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ कळतो का तुला”, तृतीयपंथीने निलेश राणे यांना सुनावले

” ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ कळतो का तुला”, तृतीयपंथीने निलेश राणे यांना सुनावले

0

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी विरोधकांवर टीकेचा बडगा उचलला आहे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जात निलेश राणेंनी टीका केली तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना हिजडा संबोधत त्यांनी उलटसुलट ट्विट केले.

निलेश राणे यांनी ‘हिजडा’ शब्दाचा उपयोग केल्याने तृतीयपंथी असलेल्या सारंग पुणेकर यांनी राणेंची चांगलीच हजेरी घेतली आहे, ” हिजडा शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर मी सांगते, पण आपली बालिशबुद्धी जगावा दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल” असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे.

निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधकांवर अतिशय कडाडून व खालच्या शब्दात टीका करत आहे. यातूनच निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली. एवढंच नाही तर त्यांना हिजडा असं संबोधलं. यावरून सारंग पुणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. निलेश राणे यांनी तृतीयपंथीयांचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. वंचित, दुर्लक्षित व समाजाने नेहमीच अन्याय केलेला तृतीयपंथी वर्ग आहे. समाज कंटकांकडून तृतीयपंथियांना कायम हिणवलं जातं. मात्र, चक्क माजी खासदार निलेश राणे यांनीही तृतीयपंथियांना हिणवणं चुकीचं आहे. यावरुन सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.