Home राजकीय सुधीर मुनगंटीवार यांच्या गाडीचा अपघात: ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावले…

सुधीर मुनगंटीवार यांच्या गाडीचा अपघात: ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावले…

0

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज चंद्रपूर जवळ अपघात झाला. यात ते थोडक्यात बचावले आहे अशी माहिती मिळत आहे. बांबूने भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली व हा अपघात झाला असल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र ही दुर्घटना ड्रायव्हरच्या सतर्कतेने बऱ्यापैकी टळली असून मुनगंटीवार तसेच गाडीतील इतर कुणालाही दुखापत झालेली नाही हे सुदैव.

चंद्रपूर येथे बल्लापूरजवळ रात्री आकाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान गाडीमध्ये मुनगंटीवार यांच्यासह त्यांचे सहाय्यक होते. बल्लापूरजवळ बांबूने भरलेल्या एका भरधाव ट्रकने मुनगंटीवार यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. मात्र मुनगंटीवार यांच्या चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ होता होता राहिला. या सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र त्याच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.