Home राजकीय राहुल गांधींनी वक्तव्यात सावरकरांचा उल्लेख केल्यामुळे शिवसेना व भाजप आक्रमक

राहुल गांधींनी वक्तव्यात सावरकरांचा उल्लेख केल्यामुळे शिवसेना व भाजप आक्रमक

0

झारखंडच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठीच्या प्रचारसभेत भाषण करतांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील बलात्कारांबद्दल बोलतांना नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. त्यावेळी बोलतांना राहुल गांधींनी “मोदींच्या मेक इन इंडिया चे रेप इन इंडिया झालेले दिसत आहे” अशा शब्दांत टीका केली. यामुळे राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने केली. मात्र राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार देऊन, “मी राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. त्यामुळे मेलो तरी माफी मागणार नाही” असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत ट्विट केले.

संजय राऊत यांचे ट्विट पुढीलप्रमाणे….

राहुल गांधींनी वक्तव्यात सावरकरांचा उल्लेख केल्यामुळे शिवसेना तसेच भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच ‘आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका’ असेही ट्विट संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत यांचे ट्विट पुढीलप्रमाणे….