Home राजकीय अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल.

0

प्राईम नेटवर्क : भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मुकेश लोढी यांनी काही दिवसांपूर्वी अलीगढ मुस्लीम  विद्यापीठाच्या आवारात मंदिर बांधण्याची मागणी केली होती. मंगळवारी लोढी हे पार्किंगमधून त्यांची गाडी काढत असताना काही विद्यार्थी त्यांच्या गाडी जवळ जमा झाले व त्यांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे देत त्यांच्या गाडीवर हल्ला केला.

दरम्यानच्या काळात एएमयू परिसरात विद्यार्थ्यांच्या एका गटाने फिरत फिरत कथित देशविरोधी घोषणा दिल्या. इतकेच नाही, तर या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी या घोषणाबाजीचा एक व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओद्वारे घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

या प्रकरणी आता पर्यंत १४ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एफआयआरमध्ये एएमयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष सलमान इम्तियाज, सचिव हुजैदा आमिर, उपाध्यक्ष हमजा सूफियान आणि संघटनेचा माजी सचिव नदीम अंसारी यांची नावे आहेत.

त्याच प्रमाणे विद्यापीठातील वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले जाणार आहे. या ५६ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यासाठी एएमयू प्रशासनाला पत्रही लिहिण्यात आले आहे.