Home खेळ स्पर्धा मी आणि युवराज गेल्यानंतर भारतीय क्षेत्ररक्षणाची वाट लागली: मोहम्मद कैफ

मी आणि युवराज गेल्यानंतर भारतीय क्षेत्ररक्षणाची वाट लागली: मोहम्मद कैफ

0

भारतीय क्रिकेटविश्वाचा क्षेत्ररक्षणातील चेहरा मोहरा बदलणारे खरे चेहरे म्हणजे मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह. २००३ मध्ये या दोघांनी केलेल्या फलंदाजी मधील भागीदारीने सर्वांची मने जिंकली. एका youtube चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद कैफ म्हणाला, ” मी आणि युवराज नंतर भारताने क्षेत्ररक्षणात प्रगती तर केली मात्र ती स्वयंपूर्ण कधीच झाली नाही”

” एखाद्या फलंदाजाला स्वयंपूर्ण म्हटले तर त्याला फलंदाजीत कट, हुक, पूल असे सर्व प्रकार जमायला हवेत, असेचं क्षेत्ररक्षणाचे सुद्धा आहे. तुम्हाला कुठल्यावेळी पळावे लागेल, कधी स्लाईड करावी लागेल तर कधी अचूक निशाणा साधत यष्टी उडवता आल्या पाहिजेत हे कळायला हवेचं”

“मी आणि युवराज ने फिल्डिंग मधून नाव कमावले, आज भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू आहेत पण स्वयंपूर्ण म्हणावे असा कुणीच नाही” असे कैफ म्हणाला

असे असताना सुद्धा भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजा सारखे खेळाडू आहेत, कोहली, बुम्हराह, रोहित शर्मा हे सुद्धा क्षेत्ररक्षणात प्रचंड प्रगती केली आहे. पण त्याने विशेष करून ए बी डिव्हीलीयर ची विशेषतः कौतुक केले त्याच्यामते ए बी हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होता.