उद्या अर्थात १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या वेस्टइंडिजच्या आगामी मालिकेआधीच मुख्य गोलंदाज भुवनेश्वर जखमी झाला आहे. उद्याच्या मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल झाली असून भुवनेश्वर टीममध्ये नाही याची फॅन्सने खंत व्यक्त केली आहे. BCCI ने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात भुवनेश्वरच्या दुखापतीसंदर्भात एक पत्रक जाहीर केलं. भुवनेश्वरच्या ठिकाणी मुंबईच्या शार्दूल ठाकुरला भारतीय क्रिकेट संघासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.
BCCI ने ही माहिती ट्विट देखील केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार शार्दूल यापूर्वी मुंबई रणजी स्पर्धेत बंगाल विरोधात खेळला होता. त्याचबरोबर त्याने बांगलादेश विरोधात टी-20 मालिका देखील खेळली आहे. भुवनेश्वरच्या जागी भारतीय क्रिकेट संघात त्याला संधी मिळाली असून भुवनेश्वरच्या दुखपतीबाबत फक्त इतकीच माहिती मिळत आहे की, वेस्टइंडिया विरोधात मुंबईत झालेल्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर जखमी झाला असल्याने आगामी वन डे मालिकेत शार्दूल त्याच्या जागी खेळणार आहे.